आंबेत- म्हाप्रळ बंद असलेली रो-रो सेवा पुन्हा सुरू

आंबेत- म्हाप्रळ बंद असलेली रो-रो सेवा पुन्हा सुरू झाली आहे. शनिवार पासून ही सेवा पून्हा सुरू झाली आहे.
आंबेत पुलाच्या दुरूस्तीच्या कामामुळे पुल सर्वप्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून रो-रो सेवा दि. १२ पासून सुरू करण्यात आली होती. या सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने दोन दिवसातच आणखी एक बोट व्यवस्थापनाला आणावी लागली होेती. मात्र मंगळवार दि. १६ पासून स्थानिक आंबेत व म्हाप्रळ येथील नागरीकांना स्थानिकांसाठी मोफत प्रवासाची मागणी केल्याने ही सेवा बंद करण्यात आली होती.मात्र शनिवार दि. २० रोजी दापोली येथे सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन प्रा. लि. चे चेअरमन डाॅ. चंद्रकांत मोकल,व मॅनेजींग डायरेक्टर डाॅ. योगेश मोकल तसेच महाराष्ट्र मेरीटाईन बोर्डाचे अधिकारी पाटील यांचेत मिटींग घेण्यात आली व ग्रामस्थांचे गैरसमज दूर करण्यात आले असून आंबेत पूलाचे दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यत ही सेवा सूरू राहणार असल्याचे सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन प्रा. लि.कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button