
चार वर्षे भूसंपादनात अडकलेल्या राष्ट्रीय महामार्गचा अंतिम निवाडा मंजूर.
गेली चार वर्षे भूसंपादन प्रक्रियेत अडकलेल्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातून जाणार्या मुख्य नाका ते १,५०० मीटरपर्यंतच्या जागेचा अंतिम निवाडा मंजूर झाला आहे. शहरातील १०० खातेदारांना मोबदला वाटपासाठीच्या नोटीसीचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गामधील गुहागर शहरातील पहिली भूसंपादन प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आतापर्यंतचे रामपूर ते गुहागर शासकीय विश्रामधामपर्यंत कॉंक्रीटचे बहुताशी काम झाले आहे. मात्र काम करण्यापूर्वी यापैकी एकाही जागेचे रितसर संपादन करण्यात आले नव्हते. मात्र शहरातील रूंदीकरण करताना प्रथम भूसंपादन करा, त्यानंतर रस्त्याचे काम सुरू करा असा पवित्रा येथील रस्त्यासाठी जागा जाणार्या खातेदारांनी घेतला होता. Guhagar-vijapurhi Highway