मांडवी पर्यटन संस्था आणि भाजपा रत्नागिरी दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन
मांडवी पर्यटन संस्था आणि भाजपा रत्नागिरी दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत रत्नागिरी शहरातील भाजपा कार्यालय येथे माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
माशांपासून फिश क्रिप्सी, फिश वडा, फिश शेव, खेकडे यांपासून सूप, कोळंबी पासून लोणचं, सूप, जवळा चटणी, कालवांचे लोणचे अशा अनेक पदार्थांचे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे.कोकणाला 720 कि. मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. कोकणात मत्स्य उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. याचा पुरेपूर उपयोग करून कोकणातील महिला आणि हॉटेल व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनवण्यास या प्रशिक्षणाद्वारे मदत होणार आहे. कोळंबी, मासे, खेकडे, कालवी यापासून विविध पदार्थ कोकणातील रेस्टॉरंट, निवास न्याहारी याठिकाणी पर्यटकांना जेवणामध्ये आस्वाद घेता येणार आहे.
हा कार्यक्रम कोकण कृषी विद्यापीठाचे मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि सूक्ष्म जीवशास्त्र विभाग तसेच मत्स्य महाविद्यालय यांच्या मदतीने होणार आहे. प्रशिक्षण देण्यासाठी मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. आशिष मोहिते आणि त्यांचे प्रशिक्षित सहकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून तो मर्यादित ठेवण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थींना मास्क अनिवार्य आहे. प्रशिक्षणार्थींनी नोंदणी साठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आत्मनिर्भर भारतचे रत्नागिरी द. जिल्हा संयोजक राजीव किर यांनी केले आहे. संपर्कासाठी ऐश्वर्या जठार (9503955454), ॲड. मनोहर दळी (7709521010) ॲड. निलेश आखाडे (9860625740) आणि संदीप सुर्वे (7743895930)
www.konkantoday.com