
सखी वन स्टॉप सेंटर केंद्र शासनाची योजना रत्नागिरीत सुरू
जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीची मदत मिळण्यासाठी वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत, समुपदेशन आणि कायदेविषयक मदत एकाच छताखाली मिळावी, याकरिता सखी वन स्टॉप सेंटर ही केंद्र शासनाची योजना रत्नागिरीत सुरू झाली आहे.
जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात शासकीय अध्यापक विद्यालयात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. लांजा येथील भारतीय कष्टकरी सेवा संस्था (भाकर) या संस्थेची केंद्राच्या परिचालनासाठी निवड करण्यात आली आहे.
www.konkontoday.com