श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील महाशिवरात्री यात्रा ११ ते १३ मार्च कालावधीत
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील महाशिवरात्री यात्रा ११ ते १३ मार्च कालावधीत होत आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ग्रामस्तरावर साध्या पद्धतीने शासन व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून ही यात्रा होणार आहे. यावर्षी बाहेरून येणार्या व्यापारीवर्गालाही यात्रा कालावधीत परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती परीविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून यात्रोत्सव होणार असून यावर्षी भाविकांना मुखदर्शनाद्वारेच श्री कुणकेश्वराचे दर्शन मिळणार आहे.
www.konkantoday.com