म्हाप्रळ आंबेत फेरी बोटसेवा म्हाप्रळ पंचक्रोशीतील स्थानिकांच्या मोफत प्रवासांच्या आग्रहामुळे बंद पडली
विशेष आग्रहामुळे सुविधांचा अभाव असतानाही १२ फेब्रुवारी रोजी सुरु झालेली रो रो फेरीबोट सेवा अवघ्या चार दिवसातच स्थानिकांच्या मोफत प्रवासांच्या आग्रहामुळे बंद पडली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर फेरीबोट सेवा बंद झाली असून बुधवारी सकाळी म्हाप्रळ येथून आंबेत येथे जाणार्या शालेय विद्यार्थ्यांना आंबेत येथे सोडण्यात आले. याकडे प्रशासनाने वेळेवरच लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आंबेत मार्गाने प्रवास करून येणार्या पर्यटकांना अचानक फेरीबोट सेवा बंद केल्यामुळे पन्नास किलोमीटर अंतराच्या लांबीचा फटका बसला आहे.
www.konkantoday.com