चिपळुणातील हॉटेल बेकायदेशीर दारू साठा जप्त
चिपळूण शहरातील प्रसिद्ध असणारे हॉटेल ओऍसीसमधील लॉजच्या रूममध्ये बेकायदेशीर देशी, विदेशी दारूसह बियरचा बेकायदेशीर साठा आढळून आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी बुधवारी हॉटेल ओऍसीसवर धाड टाकून सुमारे १ लाख ९ हजारांचे मद्य जप्त केले आहे. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश शेट्टी व शशी शेट्टी असे गुन्हे दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
www.konkantoday.com