
शिवसेना तर्फे जॅकवेलच्या कामाची पाहणी
शीळ धरण येथे सुरू असलेल्या जॅकवेलच्या कामाची पहाणी करताना प्रत्यक्ष साईटवर नगर परिषद पाणी विभागाचे अधिकारी श्री भोईर यांची शिवसेना जिल्हाप्रमुख श्री राहुल पंडित, माजी नगरसेवक श्री निमेश नायर, यांनी आपले सहकारी श्री दीपक पवार, श्री तुषार साळवी, श्री अभिजित दुडे, श्री अमित बने, श्री सूरज जुवाटकर यांच्यासमवेत भेट घेतली व प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
गणेशोत्सव सुरू असताना रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरण येथील जॅकवेल कोसळली असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शहरातील अनेक भागात शहरवासियांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते.
जॅकवेल कोसळल्यापासूनच शिवसेने मार्फत याचा नित्य नियमाने आढावा घेतला जात आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ही सदर ठिकाणी आढावा घेऊन शहरवासियांना लवकरात लवकर नियमित पाणी पुरवठा कसा करता येईल यासंबधी श्री भोईर आणि नळपाणी योजनेचे काम करणारी माणसे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच सदर काम करताना काही अडचण येत असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क साधावा अशा प्रकारची सूचना सुद्धा संबंधिताना देण्यात आली.
www.konkantoday.com