
कांदळवनावर डेब्रिज टाकण्यांवर कठोर कारवाई करा -पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कांदळवनांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे कांदळवनावर डेब्रिज टाकण्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. कांदळवनांचे जतन आणि संवर्धनासाठी आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. कांदळवनाची कत्तल रोखणे तसेच कांदळवनावर डेब्रिज टापून त्याचे नुकसान करण्याच्या प्रकाराला तत्काळ आळा घालणे आवश्यक आहे. यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत, असे आदेश आदित्य ठाकरे यांनी संबंधिअधिकाऱ्यांना दिले.
www.konkantoday.com