
रायगड, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी आणि भंडारा या जिल्ह्यांत कोरोना रूग्णांचा मृत्यूदर वाढला
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात दररोज सरासरी अडीच हजार रुग्ण आढळून आले तर दुसर्या आठवड्यात त्यात हजाराने वाढ होऊन साडेतीन हजारांहून अधिक झाली आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत रुग्णवाढीचा दर राज्यात सर्वाधिक आहे. तर, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी आणि भंडारा या जिल्ह्यांत मृत्यूदर वाढला आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत एकूण रुग्णसंख्या व मृत्यू घटले आहेत. मात्र, पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचा विषय आहे.
www.konkantoday.com