
रत्नागिरी, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अवघ्या ६० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली
रत्नागिरी, जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अवघ्या ६० टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली असून ४० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १० हजार जणांना करोनाची लागण झाली. गणेशोत्सवानंतर लागण होण्याचे प्रमाण खूपच वाढले होते. त्यानंतर ते प्रमाण कमी झाले. मात्र आता अधूनमधून रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. करोनापासून बचावासाठी नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्याचा आरंभ गेल्या महिन्यात झाला. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले.
दोन्ही टप्प्यात मिळून आतापर्यंत सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांनीच करोनाप्रतिबंधक लस घेतली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही.
जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लस घेतली. लस सुरक्षित असल्याचे आवर्जून सांगितले. मात्र सुमारे ४० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रांकडे पाठ फिरविली आहे
www.konkantoday.com