
चिपळूण गोवळकोट बंदरावरील चार ऐतिहासिक तोफा काढून गोवळकोटच्या किल्ल्यावर सुरक्षित ठेवल्या जाणार
चिपळूण गोवळकोट बंदरावरील चार ऐतिहासिक तोफा काढून गोवळकोटच्या किल्ल्यावर सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत. राजे प्रतिष्ठानकडून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
चिपळूण शहराची शान म्हणून गोवळकोटच्या ऐतिहासिक किल्ल्याकडे पाहिले जाते. या गोविंद गडावर आणि गोवळकोट बंदरावर ऐतिहासिक तोफा आहेत. शुक्रवारी सकाळी १०वा. शिवजयंतीच्या निमित्ताने चारही तोफा काढण्यात येणार आहेत. गोवळकोटमधील राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून या तोफा काढल्या जाणार आहेत. गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य डॉ. सचिन जोशी, इतिहास अभ्यासक संदीप परांजपे, पुरातत्त्व विभाग रत्नागिरी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम डिपार्टमेंट, तहसीलदार, पोलिस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
www.konkantoday.com