यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती याेजनेसाठी१६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा आराखडा तयार
यंदाच्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील २४९ नळपाणी पुरवठा योजनांसाठी १२ कोटी ७८ लाख ५५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हा आराखडा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांचा तयार करण्यात आला असून तो जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.यंदाचा आराखड्यानुसार ४६५ गावातील ७४७ वाड्यांमध्ये पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. यावर्षी विंधन विहिरींच्या दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. मात्र, १९८ गावांतील २८० वाड्यांमध्ये नवीन विंधन विहिरी खोदणे प्रस्तावित आहे. त्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ६ गावातील ९ वाड्यांतील विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी १५ लाख रुपये, तात्पुरत्या पूरक नळपाणी योजनांसाठी १ कोटी २० लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com