
कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या खेड तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव वरवली धुपेवाडी येथे एकाच दिवशी आढळले २७ कोरोनाबाधित
खेड : खेड तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहे असे वाटत असतानाच तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथे एकाच दिवशी २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी एकाच वाडीत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे हे आरोग्य यंत्रणेसाठी धोक्याची घंटा असल्याने तालुका आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खेड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण अत्यल्प राहिलेले आहे. तालुक्यात दोन-चार दिवसांआड एक किंवा दोन रुग्ण आढळून येत होते त्यामुळे खेड तालुका कोरोनामुक्त होत असल्याचे संकेत मिळू लागले होते. मात्र अचानक दुर्गम भागात वसलेल्या वरवली गावच्या धुपेवाडीत एकाच दिवशी तब्बल २७ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खेड तालुक्याला पुन्हा कोरोनाचा विळखा पडतो की काय अशी भिती प्रत्येकाच्या मनात डोकावू लागली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील वरवली धुपेवाडी येथील मंदीरात ८ फेब्रुवारीच्या रात्री भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सारे ग्रामस्थ एकत्र आले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ तारखेला यातील एका ग्रामस्थाला ताप यायला लागला. तो ग्रामस्थ लगेचच या परिसरातील आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी गेला. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वब घेऊन तो तपासणीसाठी रत्नागिरी येथील लॅबमध्ये पाठवण्यात आला. व्यक्ती कोरोनासंशयित असल्याने त्याला तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याची
पुन्हा अॅन्टीजन टेस्ट घेतली असता त्याचा अहवाला पॉझिटिव्ह आला. दण्यान रलागिरी येथील लॅबमध्ये पाठवलेल्या स्वबचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला. ८ तारखेच्या कार्यक्रमात त्या व्यक्तिचा गावातील अनेक ग्रामस्थांशी संपर्क आला होता त्यामुळे तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि वरवली धुपेवाडी येथील ४७ ग्रामस्थांचे स्वब घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. या ४७ जणांपैकी तब्बल २७ जणांची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आली आणि तालुका आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली. एकाच गावात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणे हे आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची घंटा असल्याने आरोग्य यंत्रणेने गावात ठाण मांडून या २७ जणांच्य संपर्कात आलेल्या ग्रामस्थांचा शोध घ्यायला सुरवात केली आहे. दरम्यान कोरोना
पॉझिटिव्ह आढळून आलेल्या २७ जणांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील विशेष वार्डमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. वरवली गावात ९ तारखेला आढळून आलेल्या पहिल्या कोरोनाबाधित सणाची प्रकृती ढासळली असल्याने त्याला
कळंबणी येथून रत्नागिरी येथे हलविण्यात आले असून रत्नागिरी येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
तालुका प्रशासन आणि तालुका आरोग्य यंत्रणा यांनी घेतलेल्या खबरदारीमुळे खेड तालुका हळुहळु कोरोनामुक्त होताना दिसत होता मात्र वरवली धुपेवाडी येथे एकाच दिवशी २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आणि तालुक्याची कोरोनामुक्तीकडे सुरु असलेली वाटचाल अचानक थांबली आहे.
www.konkanntoday.com