माजी खा. निलेश राणे यांचा रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खा. विनायक राऊत यांना अपशब्द वापरल्याने माजी खा. निलेश राणे यांचा शनिवारी रत्नागिरी जिल्हा शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी खा. राऊत यांचे कार्यालय ते मारुती मंदिरपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी नीलेश राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जि. प. अध्यक्ष रोहन बने, बाबू म्हाप, जगदीश राजापकर, माजी शहरप्रमुख प्रमोद शेरे, शहरसंघटक प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते.
www.konkantoday.com