खेड मध्ये रिपाइंचे सोमवारी ठिय्या आंदोलन -सुशांत भाई सकपाळ
*खेड: खेड तालुक्यातील भडगाव, भरणे-बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेच्या मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी१५ फेब्रुवारी रोजी सकाळी११वाजता ठिय्या आंदोलन छेडले जनार आहे.येथील बौद्धवाडीची कोणतीही मागणी नसताना पूल बौद्धवाडी साठी असल्याचे भासवत२० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे या पुलाचा लाभ स्वतः च्या मालमत्ते कडे जाण्यासाठी वैभव खेडकर यांना होणार असून हा पूल बौद्ध समाजासाठी कुठल्याही प्रकारे फायदेशीर ठरणार नाही.स्वतःच्या फायदासाठी शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी ज्यांचा संबंध आहे त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ या पूर्वी प्रशासना कडे निवेदनाद्रारे करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर हे ठिय्या आंदोलन छेडन्यात येणार आहे असे सुशांत भाई सकपाळ यांनी सांगितले
www.konkantoday.com