
१५ फेब्रुवारी पासून राणीची बाग पर्यटकांसाठी खुली होणार
कोरोनामुळे गेल्या तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेले पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार, १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज मंजुरी दिली असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले. राणी बाग पर्यटकांसाठी खुली होणार असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व खबरदारी घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com