रत्नागिरी जिल्ह्यात स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत अंतर्गत एकूण १८ गावांना पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यात सन २०१८-२०१९ व सन २०१९-२९ मध्ये आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव (स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत) अंतर्गत एकूण १८ गावांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण १६ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. १६ला त्यांची पुण्यतिथी असून त्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अठरा गावांची सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तालुक्यातून प्रथम आलेल्या एका गावाला दहा लाखांचे पारितोषिक असून, जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाला पन्नास लाखांचे पारितोषिक आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विकास विभागाकडून पुरस्कार पात्र गावे निवडली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून निवडलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान १६ रोजी दुपारी ४ वाजता पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सर्व आमदार, जि. प. पदाधिकारी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थित होणार आहे.
www.konkantoday.com