
महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या २ बाजू- छत्रपती संभाजीराजे
. महायुती आणि महाविकास आघाडी हे एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला पर्याय म्हणून आम्ही पुढे येत आहोत. सामान्य व्यक्तीला त्यांच्या हक्काचं बटण देण्याचं काम आम्ही करणार आहोत.लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे असं सांगत महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. लोकसभेत जनतेनं जो निर्णय दिला त्यावर विधानसभेत पुढे जाऊ असं कुणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे असं सांगत महाराष्ट्रात नवीन समीकरण उदयास आलं आहे. छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत इतर संघटना लवकरच नवा पर्याय देत निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.