पुणे येथील अनिल छाजेड आणि सुंदर यांनी दापाेलीआंजर्ले बायपास मार्गावर ४०एकर जागेमध्ये अतिभव्य असे आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारले
दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना मुंबई पुणेसह अन्य भागातून फार मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूकदार दापोली मध्ये येऊन येथील पर्यटन आर्थिक स्तर वाढवीत असताना पुणे येथील अनिल छाजेड आणि सुंदर यांनी आंजर्ले बायपास मार्गावर शंभर एकर जागेतील ४०एकर जागेमध्ये अतिभव्य असे आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारून त्यात भविष्यामध्ये आयपीएलच्या क्रिकेट स्पर्धेसह फुटबॉल बॅडमिंटन अशा खेळासाठी खेळाडूंना एक स्वतंत्र व्यासपीठ तयार केली आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा घ्यायची झाली तर त्यात असणारी सर्व तयारी आज पूर्ण झालेली असून खेळाडूंसाठी सुसज्ज जिम आवश्यकतेनुसार सर्व सुविधा त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा मैदाना भोवती खेळाडूंना बंगले हॉल याबाबतची तयारी पूर्ण झाल्यामुळे शुक्रवारी याची श्रीफळ वाढवून शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक सदानंद ऊर्फ आप्पा कदम यांच्या हस्ते करण्यात आले
रॉयल गोल्ड फीड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून हे क्रीडांगण सुरू करत असताना पहिल्या दिवशी राजू भालेकर स्मृती करंडक स्पर्धेच्या सामना भरवण्यात आला होता हा सामना मुंबई पुणे येथील खेळाडूंमध्ये खेळण्यातला यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे भगवान काकड रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे जैन अनिल छाजेड पीएम सुंदर गौस खतीब व विविध मान्यवर उपस्थित होते
www.konkantoday.com