उत्तर भारतामधील पाच राज्यांना शुक्रवारी बसला भूकंपाचा धक्का
उत्तर भारतामधील पाच राज्यांना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या पाच राज्यांमध्ये भूकंप झाला. हा भूकंप नेमक्या किती तीव्रतेचा आहे, त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
www.konkantoday.com