
महाराष्ट्रातही दोन उपमुख्यमंत्रिपदे तयार करावीत,काँग्रेसचा प्रस्ताव?
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन उपमुख्यमंत्रिपदे तयार करावीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे काँग्रेसला हे पद देण्यात यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमधील आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर मांडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे हे पद ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात यावे, अशी सूचना काँग्रेस पक्षश्रेष्ठींने केल्याचे समजते.
www.konkantoday.com