सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात एका ऑक्सिजन सिलिंडरची कॅप उडून अचानक स्फोट

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये एकत्र ठेवलेल्या एका ऑक्सिजन सिलिंडरची कॅप उडून अचानक स्फोट झाला. रुग्णालयात झालेल्या स्फोटाच्या मोठ्या आवाजाने कर्मचार्‍यांसह सर्वांचीच धावपळ उडाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान झाले नाही. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
सिंधुदुर्गनगरी जिल्हा रुग्णालयामध्ये गंभीर रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून ठेवले जातात. याचा साठा जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्ड इमारती नजीक खोलीत ठेवण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमध्ये एकत्र ठेवलेल्या एका ऑक्सिजन सिलिंडरची कॅप उडून मंगळवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला .या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने कर्मचारी आणि कोरोना वार्डात असलेले रुग्ण, आजूबाजूला असलेले कोरोना रुग्णांचे नातेवाईकांची धावपळ उडाली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button