राज्यात आतापर्यंत एकूण पाच लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली
राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना करोना लसीकरण सुरू असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत एकूण पाच लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी एक मार्चपासून सुरू होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरू आहे. प्रत्येक आठवडय़ाला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे.
www.konkantoday.com