मुंबई- गोवा महामार्गालगत भोगाव गावच्या हद्दीत खवल्या मांजराची तस्करी करणारे तीन जण वनविभागाच्या ताब्यात
मुंबई- गोवा महामार्गालगत भोगाव गावच्या हद्दीत खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी येणार्या आरोपींची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. यानंतर वनविभागाकडून धडक कारवाई करीत तस्करी करणार्या आरोपींना सापळा रचून सोमवारी सायंकाळी पकडले.
सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहनचालक राजेश लोखंडे आदी वन विभागाच्या कर्मचार्यासह भोगाव खु. कशेडी घाटात मुंबई- गोवा महामार्गावर आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला. खवल्या मांजर मादी एका पिल्लासह पोत्यात भरून रिक्षा ने नेत असताना नरेश प्रकाश कदम रा.कानुस्ते, ता. चिपळूण (रिक्षा चालक मालक), सागर श्रीकृष्ण शिर्के रा. चिवेली, ता. चिपळूण व सिकंदर भाई साबळे रा. वाघिवरे ता. चिपळूण यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com