माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे राज्य सरकारचे निर्देश
अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात गणेश मूर्ती आणि मंडपांच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
माघी गणेशोत्सव १५ फेब्रुवारी रोजी होत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा. अद्याप करोनाचे सावट पूर्णत: निवळले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com