सर्वसामान्यांनी बिल न भरल्यास वीज तोडण्याचे आदेश देणार्या सरकारी खात्याकडेच १४ कोटी ६३ लाखांची बिले थकीत
लॉकडाऊनच्या काळात वाढीव बिलावरून वाद झाल्यानंतर या बिलाच्या वसुलीबाबत राज्य सरकारने स्थगिती दिली होती. ही बिले सुधारून माफ केली जातील असे आश्वासन राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले होते त्यानंतर आता राज्य सरकारने आपला निर्णय बदलला असून सर्वसामान्य लोकांच्याकडील थकीत बिले वसुल करा अन्यथा त्यांच्या वीज जोडण्या तोडा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य वीज ग्राहकांच्यात नाराजी निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मात्र शासनाच्या अनेक खात्यांनी आतापर्यंत बिले थकवली असून रत्नागिरी जिल्ह्यातील ५९९७ शासकीय कार्यालयातील तब्बल १४ कोटी ६३ लाख रुपयांची महावितरणाची थकबाकी आहे. यामध्ये जिल्ह्यातील पथदिव्यांच्या १४९५ ग्राहकांच्याकडून ८ कोटी १२ लाखांची थकबाकी आहे.
हाच प्रकार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या बाबतीतही आहे. मात्र अनेक शासकीय कार्यालयाकडून ३१ मार्चपर्यंत थकीत बिले भरली जातील असे महावितरणाकडून सांगण्यात येत आहे.
www.konkantoday.com