रत्नागिरी जिल्ह्यावासीयांकरिता केंद्र सरकारने टोल आकारू नये, अन्यथा शिवसेना स्टाईल ने विरोध केला जाईल
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामात ठेकेदारांकडून दिरंगाई सुरू असून अनेक ठिकाणी दर्जाहीन कामे झाली आहेत,२०२४ पर्यंत काम होणे अशक्य असल्याचे सांगून रत्नागिरी जिल्ह्यावासीयांकरिता केंद्र सरकारने टाेल आकारू नये, अन्यथा शिवसेना स्टाईल ने विरोध केला जाईल केंद्र सरकारच्या वतीने २०१७ रोजी दिलेले टोलमुक्तीचे आश्वासन पूर्ण करावे असे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. या वेळी शिवसेना चिपळूण तालुका समन्वयक राजुशेठ देवळेकर, चिपळूण शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ,चिपळूण नगर पालिका आरोग्य समिती सभापती, जिल्हा नियोजन समिती सदस्य शशिकांत मोदी,बांधकाम समिती सभापती मनोज शिंदे आदी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्ग व्हावा या करिता शिवसेनेने सुरवातीपासून पाठपुरावा केला मोदी सरकार मध्ये आमचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी त्या वेळी प्रयत्न केल्या मुळे २०१७ ला महामार्गाचे भूमिपूजन झाले हा मार्ग दीड वर्षात पूर्ण होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले होते,परंतु हे काम पूर्णपणे रखडले असून संबंधित ठेकेदार अपयशी ठरला आहे,२०२४ पर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे,असेही कदम म्हणाले
www.konkantoday.com