
१४ फेब्रुवारीपासून कोकण रेल्वेमार्गावरून एर्नाकुलम ओखा विशेष गाडी धावणार
कोकण रेल्वे मार्गावर दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने १४ फेब्रुवारीपासून एर्नाकुलम ओखा ही साप्ताहिक विशेष गाडी चालविण्यात येणार असून ०६४३८ एर्नाकुलम ओखा ही गाडी २५ एप्रिलपर्यंत एर्नाकुलम येथून दर रविवारी सायं. ७.३५ सुटून सकाळी सुटणार आहे. परतीच्या प्रवासात दर बुधवारी सकाळी ६.४५ वा. ओखा येथून ही गाडी सुटून दुसर्या दिवशी रात्री ११.५५ वा. एर्नाकुलम येथे पोहोचणार आहे. १९ डब्यांची ही गाडी पूर्णपणे आरक्षित असून ही गाडी वसईमार्गे धावणार आहे. या गाडीला कोकण रेल्वे मार्गावर पनवेल, माणगांव, रत्नागिरी, कणकवली आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com