सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज होत असल्याने त्याचा जिल्ह्याला फायदा होईल आमदार दीपक केसरकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज होत आहेत. त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयोग होईल, असा विश्वास माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेले आगमन ही आनंदाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “”खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य केले. याबाबत खासदार राणे यांनी माहिती दिली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे. खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजसोबतच शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आहे
www.konkantoday.com