शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली’ -खासदार संजय राऊत

थेट शिवसेनेच्या अस्तित्वाबाबत दावा करणाऱ्या अमित शाहंना अखेर शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शिवसेना संपुष्टात आली असती म्हणणाऱ्यांना कशा प्रकारे या पक्षानं वास्तविकतेचा चेहरा दाखवला याचं प्रमाण दिलं. ‘१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० मध्ये (बहुतेक मुरली देवरा यांनी) अशाच आशयाचं वक्तव्य केलं होतं की शिवसेना संपली. पुन्हा २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच काहीसं म्हटलं. पण, या दोन्हीही प्रसंगी शिवसेना आधीपेक्षा जास्त ताकदीनं उभी राहिली’, असं राऊतांनी ट्विट करत शाहंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर केलं. जय महाराष्ट्र! लिहित त्यांनी आपल्या उत्तराला अधिक जोर दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button