सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, अशी आम्हा सर्व कलाकारांचीही भावना आहे -दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते संजय जाधव
चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र गेली १५ वर्ष बंद आहे, हे धक्कादायक आहे. सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, अशी आम्हा सर्व कलाकारांचीही भावना आहे. तुम्ही रंगकर्मी मंडळी त्यासाठी निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहात. त्यासाठी पारावर कार्यक्रम करून एक मोठी चळवळ तुम्ही उभारली आहे. ही चळवळ कायम ठेवा, मी स्वतः इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, यासाठी सुबोध भावे यांना यात लक्ष घालावे, याची एकदा आठवण करून देतो. तसेच सुशांत शेलार यांनाही या विषयात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती करतो, असे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते संजय जाधव यांनी सांगितले. संजय जाधव चिपळूण येथे आले असता येथील रंगकर्मींनी त्यांची भेट घेतली. युवा उद्योजक अजिंक्य अशोक जाधव यांनी ही भेट घडवून आणली. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी संतोष केतकर, मंगेश बापट, संगीता जोशी, योगेश बांडागळे, संगीता पालकर, छाया पोटे, मयुरेश भागवत, समिधा बांडागळे, रसिका जोशी आदी उपस्थित होते. रंगकर्मींच्या वतीने संजय जाधव यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
www.konkantoday.com