रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने ग्रामीण भागासह शहरी भागात इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले
कोरोनाच्या संकटातून सावरत असतानाच केंद्रसरकारने महागाईचा झटका सर्वसामान्यांना दिला़. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या प्रचंड दरवाढीचा फटका गोरगरिबांना बसला आहे. वाढत्या पेट्रोल, डिझेल दरावर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही प्रयत्न केंद्रसरकारने केला नाही़. त्यामुळे डिझेल दरवाढीच्या भडक्याने सर्वसामान्य नागरिक होरपळला आहे. त्याचेच पडसाद शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात उमटले. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने ग्रामीण भागासह शहरी भागात इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले. जिल्ह्यातील ५६ जि.प.गटांमध्ये निदर्शने करुन पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली़.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरीत सोमवारी शिवसैनिकांनी आंदोलन छेडले. जिल्ह्यातील ५६ जि.प. गटांमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करत केंद्रसरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. सकाळी ११ ते १२ या वेळेत प्रत्येक जिल्हा परिषद गटात विभागप्रमुख, जि.प.सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आंदोलन छेडले.
www.konkantoday.com