गुहागर आणि वेळणेश्वर येथील समुद्रकिनार्यांचाही विकास करावा–खा. सुनील तटकरे
दरवर्षी भारतासह जगभरातील ३३० मिलियन पर्यटक तीर्थस्थळांना भेट देतात. रायगड लोकसभा मतदार संघातील कड्यावरचा गणपती (आंजर्ले, ता. दापोली), दशभुज लक्ष्मीगणेश (हेदवी, ता. गुहागर), आणि याकुबबाबा दर्गा (ता. दापोली) या तीर्थस्थळांचा विकास स्वदेश दर्शन योजनेतून व्हावा. त्याचप्रमाणे गुहागर आणि वेळणेश्वर येथील समुद्रकिनार्यांचाही विकास करावा अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com