
रेल्वे मार्गावरही चाकरमानी खाेळंबले.
गणेशाेत्सवासाठी चाकरमान्यांनी काेकण मार्गावरून धावणार्या रेल्वेगाड्यातून रेटारेटीचा अन लाेंबकळत प्रवास करत गाव गाठण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारीही रखडपट्टीच्या प्रवासाची भर पडली. पाचही गणपती स्पेशल विलंबाने धावल्याने गणेशभक्तांच्या मार्गात मनस्ताप कायम राहिला. अन्य 11 रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने चाकरमानी खाेळंबले. काेकण मार्गावर स्पेशल गाड्यांची संख्या वाढल्याने वेळापत्रक पुरते बिघडले आहे.गणेशाेत्सवासाठी मध्य, काेकण व पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या गणपती स्पेशलसह विक्रमी गर्दीने धावत आहेत. www.konkantoday.com