तुळसणी-देवरूख गावचे सुपुत्रराष्ट्रीय कबड्डीपटू प्रशांत सुर्वे यांची प्रशिक्षकपदी निवड

तुळसणी-देवरूख गावचे सुपुत्र व राष्ट्रीय कबड्डीपटू प्रशांत सुर्वे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तर्फ़े कबड्डी पुरुष गटासाठी प्रशिक्षक म्हणून( राष्ट्रीय स्पर्धेसाठी) निवड झाली आहे.
प्रशांत सुर्वे हे देवरूखातील सह्याद्री क्रीडा मंडळाचे सदस्य असून त्यांनी मुबंई विद्यापिठतंर्गत देवरूख काँलेजकडून खेळताना अनेक पदके मिळविली. त्यानंतर त्यांनी आपल्या चतुरस्त्र खेळाने जिल्हात अनेक स्पर्धा गाजवल्या.
त्यानंतर ते मुंबईत बँके कडून व क्रिडा मंडळाकडून खेळताना महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रीय स्पर्धात त्यानी गाजवल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्र कबड्डी असाेसिएयनवर कार्यरत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button