
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाला गती येणार
मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याच्या कामाला गती येणार आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणार्या सुमारे १९०कोटीच्या बंधार्यासाठी कन्सल्टंट म्हणून पुण्याच्या ‘मोनार्च’ कंपनीची नियुक्ती केली आहे.. या धूपप्रतिबंधक बंधारार्यासाठी एकूण १९०कोटी रुपये मंजूर आहेत. याचा सर्व्हे पूर्ण होऊन सीब्ल्यूपीआरसी कंपनीने ११० कोटीच्या धूपप्रतिबंधक बंधार्याला तांत्रिक मंजूरी दिली आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात बंधार्याचे काम होईल. दुसर्या टप्प्यात उर्वरित ८० कोटीच्या ब्रेक वॉटरवॉलचे काम केले जाणार आहे
www.konkantoday.com