
कोकण रेल्वे मार्गावर तीन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक’
कोकण रेल्वे मार्गावरील आरवली ते संगमेश्वर स्थानकांदरम्यान उभारण्यात आलेले कडवई हे नवीन रेल्वेस्थानक सेवेत दाखल करण्यापूर्वीच्या कामाचा एक भाग म्हणून १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० असा ३ तासांचा ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार असल्याची माहिती जनसम्पर्क अधिकारी जी. आर. करंदीकर यांनी दिली आहे.
या कामामुळे कमीत-कमी गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होईल, असे रेल्वेकडून नियोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




