
जि. प. गोखले कन्याशाळेला स्मार्ट स्कूल बनविण्याचे आमदार किरण सामंत यांचे आश्वासन.
गोखले कन्या शाळेच्या ज्या काही अत्यावश्यक गरजा आहेत. त्या आपण पुर्ण करूच परंतु या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावलेला असल्याने या शाळेचा रत्नागिरीतील खेडशी शाळेच्या धर्तीवर स्मार्ट स्कूल म्हणून विकास करण्याचे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात शहरातील जि. प. गोखले कन्याशाळेने प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार श्री. सामंत यांनी मंगळवारी शाळेला भेट देवून शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले