
सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येणार -मुख्यमंत्री
स्वदेशी बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. पुढील काळातील तीन ते चार वर्षे मुंबईसाठी विशेष असतील सामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो ट्रेनच्या डब्यांचे अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचे उदघाटन आणि ब्रँडिंग मॅन्युअलचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आले.
www.konkantoday.com