राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था, पदवी महाविद्यालये व विद्यापीठे त्वरित सुरू करण्याची कुलगुरूंची मागणी
राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था, पदवी महाविद्यालये व विद्यापीठे त्वरित सुरू करण्याची मागणी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. महाविद्यालये सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे. मात्र राज्य सरकारच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरू करता येत नसल्याचे कुलगुरूंनी राज्यपालांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत सांगितले.
www.konkantoday.com