
खेडचे नगराध्यक्ष मनसेचे नेते वैभव खेडेकर यांना तातडीने पदावरून अपात्र करून त्यांच्या विरोधात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा-माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम
खेडचे नगराध्यक्ष मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून पालिकेतील शिवसेना गटनेते यांच्यासह नऊ नगरसेवक यांनी पुराव्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रत्नगिरीचे जिल्हाधिकारी व नगरविकास सचिव यांच्याकडे तक्रार केली आहे. खेडेकर यांना तातडीने पदावरून अपात्र करून त्यांच्या विरोधात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी पाठपुरावा आम्ही करणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com