
शिरोडा वेळागर येथे ताज ग्रुपच्या पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
ठाकरे सरकारने शिरोडा वेळागर येथे ताज ग्रुपचा पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलन छेडण्यात आले.
सव्र्हे नं. ३९ मधील पेन्सील नोंदी रद्द करा..ताज ग्रुपला जमीन देणार नाही.संघर्ष समितीचा विजय असो. अशा गगनभेदी घोषणा आंदोलनकर्त्यांंनी चक्क समुद्राच्या पाण्यात उभे राहून देत शिरोडा समुद्र किनारा दणाणून सोडला. या नागरिकांनी आपले सगळे व्यवसाय व घरे बंद ठेऊन या आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे दररोज गजबजलेला शिरोडा किनारा सुनासुना वाटत होता.
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन प्रकल्प उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीला मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला असून आपल्यावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी स्थानिक भूमिपूत्रांनी उपोषणाचे शस्त्र उचलले आहे.
www.konkantoday.com




