
रत्नागिरीच्या सुकन्येची नेमबाजीत भरारी,रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भक्ती भास्कर खामकर हिची भारतीय नेमबाजी संघात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भक्ती भास्कर खामकर हिची भारतीय नेमबाजी संघात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ६ फेब्रुवारीला दिल्ली येथे वर्ल्ड कप स्पर्धेच्या ट्रायलसाठी भक्ती रवाना होणार आहे.२०१९ ला दोहा कतार येथे झालेल्या १४ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ४ पदके पटकावली होती. यामध्ये २ गोल्ड, १ सिल्वर आणि १ ब्रोंस पथकाचा समावेश आहे. तसेच गेली दहा वर्ष नेमबाजीत महाराष्ट्र चॅम्पियन आहे. भक्ती हीचा ५० मीटर ३पोझिशन रायफल हा खेळ प्रकार आहे.तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com