
आता पोस्ट कार्यालयाच्या बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे गरजेचे
पोस्ट खात्यानं एक महत्त्वपूर्ण घोषणा केलीय. ही घोषणा पोस्ट कार्यालयाच्या बचत खात्यातील किमान शिल्लक रकमेसंदर्भातील आहे. आता बचत खात्यात किमान रक्कम किती ठेवावी लागेल यासंदर्भात टपाल खात्याने माहिती दिलीय. आतापर्यंत आपल्याला बँकांमधील बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागत होती. आता ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यासाठीही हा नियम लागू करण्यात आलाय. किमान रकमेच्या स्वरूपात पैसे ठेवणे अनिवार्य करण्यात आलंय
www.konkantoday.com