गुहागर समुद्रकिनार्यावर पर्यटकांच्या सुरक्षिता केवळ २ जीवरक्षकांवर
येथील समुद्रकिनार्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणार्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन जीवरक्षक सांभाळत आहेत. नव्याने निधी उपलब्ध होण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने आणि जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र १६ महिने उलटून गेले तरी राज्य शासनाने या पत्राची दखल घेतलेली नाही.
www.konkantoday.com