वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसमध्ये सापडले कासव लांजा येथे वनविभागाच्या ताब्यात
लांजा तालुक्यातील वेंगुर्ले-रत्नागिरी एसटी बसमध्ये सापडलेल्या कासवाला लांजा येथे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. कासव गोड्या पाण्यातील असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. या कासवाला नदीत सोडण्यात आले. वेंगुर्ला-रत्नागिरी ही बस फेरी रविवारी सकाळी १०.५० वा. लांजा बसस्थानकात आली. मार्गावर या बसमध्ये कासव फिरत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. या बसचे चालक श्रीकांत खोत, वाहक शैलेंद्र केदार आणि लांजा एसटी वाहूक नियंत्रक विशाल लांबोरे यांच्या ताब्यात दिले.
www.konkantoday.com