
अखेर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू दुर्ग किल्ले स्मारके उघडण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले ,जि प अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या पाठपुराव्यामुळे लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारकही उघडणार
अखेर जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू दुर्ग किल्ले स्मारके उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारीलक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल तातडीने काढले आहेत रत्नागिरी शहरातील टिळक जन्मभूमी स्मारक पर्यटकांसाठी खुले करावे अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी वारंवार करून पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले आहे कोकण टुडे ने देखील याबाबत कालच सविस्तर वृत्त लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक अजूनही पुरातत्त्व विभागाच्या बंदिवासात या नावाने प्रसिद्ध केले होते रत्नागिरी शहरात असलेले लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत होते आणि हे स्मारक बंद असल्याने त्यांची निराशा होत होती याबाबत गेले दोन महिने जि.प माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी पाठपुरावा केला होता याबाबत त्यांनी कालच गृह मंत्री अनिल देशमुख यांच्याशी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क करून हे स्मारक खुले करण्याची मागणी केली होती शेवटी त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत काल तातडीने आदेश काढले आहेत या आदेशात म्हटले आहे की काेव्हिड 19च्या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू दुर्ग किल्ले स्मारके संग्रहालये इत्यादी ठिकाणे नागरिकांना व पर्यटकांना बंद करण्यात आले होते ही स्थळे सुरू करावीत अशी नागरिकांची व लोकप्रतिनिधींची मागणी होत होती त्यामुळे आपण आपल्याला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ही स्थळे सुरू करण्यास परवानगी देत आहोत मात्र शासनाने बंधनकारक केलेले सुरक्षित अंतर, मास्क वापरणे व वेळोवेळी हात धुणे आदी गोष्टींचे पालन पर्यटकांना व नागरिकांना काटेकोरपणे करावे लागेल असेही आदेशात म्हटले आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तू किल्ले संग्रहालय सुरू केल्याने नागरिकांनी व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे
www.konkantoday.com