सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तीन बोटीच्या मदतीने निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन अंदाजे ४०० फूट लांब भारताचा तिरंगा बनवला

लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर आणि अनेक विक्रम पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखी सलामी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणमधील दांडी समुद्राच्या मध्यभागी जाऊन सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तीन बोटीच्या मदतीने निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन अंदाजे ४०० फूट लांब भारताचा तिरंगा बनवला.
यापूर्वीही प्राजित परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १५ऑगस्ट २०१९ रोजी ३२१ फुटांची भव्य तिरंगा रॅली लोणंदमध्ये काढली होती. मागील वर्षी सिंहगडावर ३५०फूट भगवी रॅली काढून तानाजी मालुसरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती तर तीन महिन्यांपूर्वी कळसूबाई शिखरावर तिरंगाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा काढण्यात आला होता.मागील महिन्यात मालवण समुद्रामध्ये ३२१ फूट तिरंगा फडकवला होता.
प्राजित परदेशी यांची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी अॅडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे, वनरक्षक विश्वास मिसाळ, राहुल परदेशी आणि मालवण इथल्या अन्वय अंडरवॉटर सर्विसेसचे रुपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, राश्मीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्य लाभले. ते तीन बोटींद्वारे सुमारे तीन किलोमीटर आत समुद्रामध्ये गेले. यानंतर दांडी बीच समुद्रात निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन ४०० फूट लांब भारताचा तिरंगा साकारला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त एक आगळीवेगळी सलामी देण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button