प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
सगळ्यांच्या मनातून कोरोनाची भीती जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच पार पडतील, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सध्या महाविद्यालये कधी सुरु होणार, असा प्रश्न सगळ्यांकडून विचारला जात आहे. विद्यापीठांशी चर्चा करुन यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.तुर्तास तरी महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होतील, हे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्यासाठी कोरोनाची साथ पूर्णपणे जाण्याची वाट पाहावी लागेल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com